‘मशिदीत घुसून चून चून के…’, नितेश राणेंचं ‘ते’ प्रक्षोभक भाषण वादात अन् गुन्हे दाखल

| Updated on: Sep 03, 2024 | 10:37 AM

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा प्रक्षोभक भाषण करून धमकी दिली आहे. रामगिरी महाराजांबद्दल कुणी विरोधात बोलाल तर मशिदीत शिरून चून चून के मारेंगे...असा इशाराच नितेश राणे यांनी दिला. यानंतर श्रीरामपूर, अहमदनगर येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामगिरी महाराज यांच्याबद्दल विरोधात बोलले तर मशिदीत शिरून चून चून के मारेंगे…अशी थेट धमकीच नितेश राणेंनी दिली आहे. “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे,” असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंच्या या धमकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केलाय. ‘साहेब, हे दंगलखोर कोण आहे? तुम्ही म्हणता विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहे? राज्याचे गृहविभाग कुठे आहे? गृहमंत्री गप्प का? कोणती कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करणार नाही आणि करूच शकत नाही’, असे एक ना अनेक सवाल केल्याचे पाहायला मिळाले. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 03, 2024 10:37 AM
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धुव्वाधार, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट; मुंबईत कसा होणार पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?
अजितदादांचं होमग्राऊंडवरुन थेट आव्हान, ‘असेल धमक तर या समोर, मग बघतो ना…’