पापी अन् चपट्या पायाच्या लोकांना आयोध्येत आणू नका, राऊतांच्यावर कुणाची जिव्हारी लागणारी टीका?

| Updated on: Dec 22, 2023 | 6:29 PM

राम मंदिर सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याचे समोर आले आहे. यावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक वार सुरू झालाय. ज्यांचं कोणतंही योगदान नाही त्यासाठी त्यांचा तो सोहळा असं संजय राऊत म्हणाले यावरून कुणी केला पलटवार?

सिंधुदुर्ग, २२ डिसेंबर २०२३ : राम मंदिर सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याचे समोर आले आहे. यावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक वार सुरू झालाय. ज्यांचं कोणतंही योगदान नाही त्यासाठी त्यांचा तो सोहळा असं संजय राऊत म्हणाले होते. यावर नितेश राणे यांनी पटलवार केलाय. राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरे यांच काय योगदान आहे. याचा पुरावा द्यावा. आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत बसला होता. त्यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही ना राम मंदिराशी…असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊत राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात जे लेख लिहिलेत ते मी दाखवू शकतो. अशा पापी लोकांना चपट्या पायाच्या लोकांना एवढ्या पवित्र स्थानी आणू नये, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी करत त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Dec 22, 2023 06:29 PM
शिंदे गटाचा ‘वर’ आणि ठाकरे गटाची ‘वधू’ यांचे जुळले सूर, कुठं बांधली अनोखी लग्नगाठ?
चर्चा तर होणारच ना…राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, कुठं आले आमने-सामने?