ठाकरे गटाच्या मिरवणुकीत पाकचा झेंडा, आता अल-कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी…; भाजप नेत्याचा आरोप
भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता पीएफआय, सिमी, अल कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील, असं म्हणत निेतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली आहे. बघा नेमकं काय केल नितेश राणेंनी ट्वीट?
ठाकरे गटाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आता पीएफआय, सिमी, अल कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील, असं म्हणत निेतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटद्वारे ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले की, ‘ उद्धव ठाकरे यांच्या मिरवणुकीत पाकिस्तान चा झेंडा ! आता काय PFI , SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील… हे दाऊद चं मुंबईत स्मारक पण बांधतील.. आणि म्हणे हा मा.बाळासाहेबांचा “असली संतान”…असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर सडकून टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
Published on: May 14, 2024 03:56 PM