शरद पवारांचा मुका घ्यायचं बंद करा, भाजप नेत्यानं जरांगे पाटलांना फटकारलं

| Updated on: Aug 16, 2024 | 6:08 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक वार चांगलेत रंगताना दिसत आहे. अशातच भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना फटकारलं आहे.

एखाद्या व्यक्तीमत्त्वाचं किंवा आंदोलकाचा किती सन्मान करायचा याची एक मर्यादा असते, पण वेळोवेळी राजकारण करून समाजकारणाला खड्डयात घालण्याचं काम मनोज जरांगे पाटील करत आहे, असे वक्तव्य करत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आरक्षण दिल्यास देवेंद्र फडणवीसांचा मुका आम्ही घेऊ, असे वक्तव्य तुम्ही करतात, पण तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो हे धंदे करून मोठे झालो. प्रवीण दरेकरांना म्हणतात घरात घुसून पंखे तोडू, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मुंबईत या असे म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण तुम्ही शरद पवार यां मुका घेण्याचं बंद करा, असे वक्तव्य करत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारलं आहे.

Published on: Aug 16, 2024 06:08 PM
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी, दोघे एकाच मंचावर अन्…
लाडकी बहिण योजना, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 2 हप्ते जमा झाल्याने पोस्टात तोबा गर्दी