जरांगेंनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये, त्यांनी फक्त झोपून… नारायण राणेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये, असं वक्तव्य करत भाजप नेते मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी फक्त झोपून आंदोलन करावं, अशी खोचक टीकादेखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर नारायण राणे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील एवढा मोठा नाही की, त्यांच्यासाठी बीजेपी सारख्या पक्षाने अभियान सुरू करावं. जरांगे पाटील कोण माणूस आहे? असा सवाल करत भाजप नेते मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्हाला आणि आमच्या आमदाराला कोणी सांगायची गरज नाही, आम्ही स्वतः मराठवाडा दौरा करण्यासाठी चाललोय. जाती-धर्मासंदर्भात एक चांगलं वातावरण राहावं म्हणून मराठवाडा दौरा करत असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. जरांगेला राजकीय अभ्यास नाहीये आणि आमच्या देवेंद्र फडणवीस ला चांगला अभ्यास आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात पडू नये, तो त्याचा विषय नाही. तर मनोज जरांगे पाटीलाने फक्त झोपून आंदोलन करावं, हा त्यांचा विषय असल्याचे म्हणत नारायण राणेंनी खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
Published on: Aug 11, 2024 11:40 AM