‘आता मातोश्रीचं पावित्र्य राहिलं नाही’, भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितली सध्यस्थिती

| Updated on: Apr 13, 2023 | 4:01 PM

VIDEO | भाजप नेत्यानं बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत सध्याच्या राजकारणातील झालेला मोठा बदल एका वाक्यातच सांगितला

मुंबई : राज्यातील राजकारणाच्या इतिहासात नेते मातोश्रीच्या दारात जायचे आजपर्यंत असा इतिहास होता. मात्र आता उद्धव ठाकरे नेत्यांच्या घरी जाताना दिसताय. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्या घरी गेले असल्याचे म्हणत त्यांनी बाळासाहेब कधीच कुणाच्या दारी गेले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता मातोश्रीचं पावित्र्य राहिलं नसल्याचे सांगत थोडक्यात सगळी सध्यस्थितीच सांगितली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. आदित्य ठाकरे यांना बालिश म्हणत एका वाक्यात त्यांचा निकाल लावला आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो, असे म्हणत एकच हल्लाबोल केला.

Published on: Apr 13, 2023 04:01 PM
शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते; भुमरेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
‘आदित्य आणि उद्धव ठाकरे हे गोंधळलेले पात्र’, ‘या’ नेत्यानं केली सडकून टीका