‘उसको कौन पूछता है? उधर दिल्ली में तो हिंदी, इंग्लिश…’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये कोण विचारतं? असा सवाल भाजपचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदी आणि इंग्रजी येत नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा गट छोटा आहे, त्यांचं दिल्लीत काही चालत नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भाजप नेते नारायण राणे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर सवाल केला असता, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘उद्धव ठाकरे को कौन पूछता है, दिल्ली में उधर तो हिंदी इंग्लिश में बोलना पड़ता है ना उसको हिंदी आता है ना इंग्लिश आता है, मराठी उधर चलती नहीं है और उधर ठाकरे दिल्ली किस लिए जाता है’, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत खोचक सवाल केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, उसका पार्टी एकदम छोटा सा है, उसको कुछ महत्त्व नहीं है.. तो वहां जाने से कुछ उसका चलने वाला नहीं है… , असेही वक्तव्य करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Published on: Aug 11, 2024 01:58 PM