पोपट मातोश्रीत एंट्री करत होता, तेव्हा चांगला होता?, नारायण राणे यांचा कुणाला सवाल

| Updated on: May 16, 2023 | 1:55 PM

VIDEO | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे डिप्रेशनमध्ये...नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत चांगलंच तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केले. पोपट मेलाच आहे, फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. याच वक्तव्याचा नारायण राणे यांच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. संजय राऊत यांना सध्या काही कामधंदा नाही. पोपट मेला वैगरे ही त्यांची भाषा आहे का? असा सवाल राणेंनी केला. पुढे नारायण राणे असेही म्हणाले की, पोपट शिवसेनेत होता तेव्हा चांगला होता. भरारी घेत होता. पंखावर काहीतरी घेऊन मातोश्रीवर एन्ट्री करत होता. तेव्हा चांगला जिवंत होता. आता पोपट मेला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो. त्यांच्याबद्दल कोणीही उपशब्द बोलू नयेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे त्यांची सत्ता गेल्यामुळे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे वेड्यासारखे काहीही बडबडताय. हे लोकं चांगंल बोलू शकत नाही असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

Published on: May 16, 2023 01:55 PM
कोणत्या प्रकरणावर पटोले यांनी मागितला फडणवीस यांचा राजीनामा?
काय बोलावं ‘या’ सगळ्यावर? राज्यातील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर अभिनेते वैभव मांगले भडकले अन्…