कपडे घातले काय अन् नाही घातले काय? सारखाच, तुझ्यात…; नारायण राणेंची जरांगेंवर जहरी टीका
भाजप नेते नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देत आपण मराठवाड्यात येऊन सभा घेऊन दाखवणार असल्याचं म्हटलं होतं. या चॅलेंजवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देताना खोचक पलटवार केला होता. जरांगेंच्या त्या खोचक वक्तव्याला आता नारायण राणे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात चांगलंच शाब्दिक वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय सभांमधून भाषणं करताना नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील यांची भाषा काहिशी ढासळताना दिसतेय. सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमात बोलत असताना नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जोरदार हल्लाबोल केला. ‘अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो, तुझ्यात आहे काय बघण्यासारखं?’ असं म्हणत नारायण राणेंनी जिव्हारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली आहे. नारायण राणे साहेब मराठवाड्यात येतातय, येऊ दे, आमच्याकडे काय बघणार, आम्ही कपडे घालतो, असे विधान मनोज जरागे पाटलांनी सोलापूरमध्ये केलं होतं. यावर नारायण राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. पुढे नारायण राणे असेही म्हणाले, ‘दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही. त्यांच्या अंगामध्ये तसे गुण असायला लागलात.