नारायण राणे आणि जरांगे पाटलांमध्ये जुंपली, मराठवाड्यात येतोय, बघू जरांगे काय करतो? थेट इशारा

| Updated on: Aug 05, 2024 | 10:28 AM

गणपतीनंतर मराठवाड्यात जाणार, बघू मनोज जरांगे पाटील काय करतो, असा इशारच माजी मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. मात्र सलोख्यासाठी येणारे नारायण राणे स्वतःच इशाऱ्याची भाषा का करताय? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र एकटा नाही, आम्ही सगळे.... राणे काय म्हणाले?

मराठवाड्याची घोषणा करत नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना एकामागोमाग नेते मराठवाड्या दौऱ्यांचे नियोजन करत आहेत. गणपतीनंतर मराठवाड्यात जाणार, बघू मनोज जरांगे पाटील काय करतो, असा इशारच माजी मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. मात्र सलोख्यासाठी येणारे नारायण राणे स्वतःच इशाऱ्याची भाषा का करताय? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र एकटा नाही, आम्ही सगळे भाजप त्यांच्या सोबत असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केलाय. इतकंच नाहीतर मराठवाड्यातच दौरा का याचंही उत्तर त्यांनी दिलंय. तर महाराष्ट्रातील सलोखा धोक्यात आहे अशी विधानं १५ दिवसांपूर्वी छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आणि त्यानंतर नारायण राणे यांनी देखील केलं होतं. बघा कोणी काय काय म्हटलं होतं?

Published on: Aug 05, 2024 10:28 AM