विचारला एक प्रश्न, उत्तर दिलं भलतंच… इंग्रजी प्रश्नावर राणेंची गोची, अंजली दमानियांचा निशाणा; म्हणाल्या, नुसती…

| Updated on: Feb 06, 2024 | 5:46 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत गडबडल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. कामागारांच्या प्रश्नासाठी काय पावलं उचलणार आहात? असा प्रश्न नारायण राणे यांना उद्देशून विचारण्यात आला. पण तो प्रश्न इंग्रजीत विचारण्यात आल्याने नारायण राणेंची गोची झाली.

मुंबई, 6 फेब्रुवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत गडबडल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. कामागारांच्या प्रश्नासाठी काय पावलं उचलणार आहात? असा प्रश्न नारायण राणे यांना उद्देशून विचारण्यात आला. पण तो प्रश्न इंग्रजीत विचारण्यात आल्याने नारायण राणेंची गोची झाली. यावरून अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आणि त्यावर कॅप्शन देत नारायण राणेंवर हल्लाबोल केला. म्हणाल्या, “नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला. MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार? हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका…. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा आणि चालना देणार? नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात. आणि बॉसचा वरदहस्त फार काळ चालत नाही”, अशा खोचक टोलाही लगावला.

Published on: Feb 06, 2024 05:45 PM
देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण अन्… अमृता फडणवीस यांची उखाण्यातून विरोधकांवर टोलेबाजी
अजित पवार राष्ट्रवादीचे ‘दादा’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवार यांना धक्का