Navneet Rane : ‘होऊन जाऊद्या… रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील’, नवनीत राणांचं विरोधकांना थेट आव्हान
महायुतीचा २३५ जागांवर दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले. याऊलट महाविकास आघाडीला केवळ ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले. या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेत ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे म्हटले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आणि पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं. तर सर्व एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला. महायुतीत एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या. तर महायुतीचा २३५ जागांवर दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले. याऊलट महाविकास आघाडीला केवळ ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले. या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेत ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे म्हटले. अशातच अमरावतीच्या खासदार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केली आहे. रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर निवडणुका, असं म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. ‘महाविकास आघाडीला ईव्हीएम मशीनवर जो आक्षेप आहे. त्यांना माझं आव्हान आहे की, अमरावती जिल्ह्याच्या खासदार यांनी राजीनामा द्यावा आणि रवी राणा देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. आपलं मतदान होऊन जाऊद्या बॅलेट पेपरवर…’, असं म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांना खुलं आव्बान दिलं आहे.