‘मी ओरिजनल, शेवटी ब्रँड हा ब्रँड’, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ‘त्या’ स्टाईलवरून नवनीत राणांचा पलटवार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी बाण सोडण्याची स्टाईल केल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर अमरावतीतील विजयानंतर यशोमती ठाकून यांनी नवनीत राणांची सेम टू सेम स्टाईल कॉपी करत डिवचल्याचे पाहायला मिळाले होते. यावर नवनीत राणांनी पलटवार केलाय
मी ओरिजनल आहे. कॉपी करणारे अनेक असतात, पण ब्रँड हा ब्रँड असतो, नवनीत राणा यांनी असं वक्तव्य करून यशोमती ठाकूर यांना खोचक टोला लगावला आहे. बाण सोडण्याच्या स्टाईलवरून नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी बाण सोडण्याची स्टाईल केल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर अमरावतीतील विजयानंतर यशोमती ठाकून यांनी नवनीत राणांची सेम टू सेम स्टाईल कॉपी करत डिवचल्याचे पाहायला मिळाले होते. यावर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी जे करते ते ओरिजनल करते. ब्रँडला लोकं कॉपी करतात. पण शेवटी ब्रँड हा ब्रँड असतो’, असे नवनीत राणांनी म्हटले आहे. बघा काय म्हणाल्या नवनीत राणा?
Published on: Jun 26, 2024 03:38 PM