शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे. दरम्यान, या ट्वीटच्या माध्यमातून निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार नेते वैभव नाईक यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले?’ असे सवाल निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल उपस्थित केले आहे. ‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.’, असं ट्वीटच निलेश राणे यांनी करत वैभव नाईक यांच्यावर शंका उपस्थित केली आहे.
Published on: Aug 30, 2024 01:19 PM