Nitesh Rane : महाराष्ट्रातील हिंसक परिस्थितीचा मास्टर माईंड कोण? नितेश राणे स्पष्टच म्हणाले…
मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चे काढून एक वेगळाच इतिहास रचला. या मोर्च्याच्यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. गालबोट लागलं नाही. त्याच मागणीसाठी आज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करत आहे. मग राज्यात आताच हिंसक परिस्थिती कशी निर्माण झाली? नारायण राणे काय म्हणाले?
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीने आता हिंसक वळण घेतले आहे. काल अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची घरं पेटवली तर काही ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पेटवून त्यांची मोठी तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या परिस्थितीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. ‘मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चे काढून एक वेगळाच इतिहास रचला. या मोर्च्याच्यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. गालबोट लागलं नाही. त्याच मागणीसाठी आज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करत आहे. वारंवार समाजाला हिंसक आंदोलन करू नका असे सांगताय. जर असं केलं तर मी वेगळा निर्णय घेईल. याचा अर्थ म्हणजे या आंदोलनात अदृश्य शक्ती घुसली आहे. मराठा आंदोलन आणि समाजाला बदनाम करण्याचं काम सुरूये. सरकार आरक्षणावर काम करत असताना कोणाला दंगल हवी आहे. हे सगळं कोण घडवतंय. महाराष्ट्रातील हिंसक परिस्थितीचा मास्टर माईंड कोण?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.