‘मविआ’वर मंगल कार्यालयात सभा घेण्याची वेळ येणार, कुणाचं टीकास्त्र?

| Updated on: May 02, 2023 | 2:16 PM

VIDEO | महाविकास आघाडीच्या कालच्या मुंबईतील बीकेसीवर झालेल्या सभेवर भाजप नेत्याचा हल्लाबोल, बघा काय केली टीका?

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या कालच्या मुंबईतील बीकेसीवर झालेल्या सभेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत याच्या मालकाने लहान मैदानात सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल. तर कालच्या सभेत अल्पसंख्याक लोक अधिक होते. उद्धव ठाकरे यांनी नाका खालचा मतदार त्यांना संघ राखता आला नाही’, असे म्हणत नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. तर कालच्या मविआच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?, असा थेट सवालही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार यांनी माझ्या पत्रकारपरिषदेचा उल्लेख केला असे म्हणत नितेश राणे म्हणाले, ते करमुक्त आहेत त्यांच्यावर कोणतीच टीका करणार नाही आणि काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनाही खोचक टोला लगावला.

Published on: May 02, 2023 02:16 PM
‘नितेश राणे यांना राजकारणातली अक्कलदाढ अजून यायचीये’, कुणाची सडकून टीका
Sharad Pawar | शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, ‘… तो निर्णय मान्य असेल’