‘महाराष्ट्र सोडा फक्त मुंबई तरी बंद करून दाखवा’, उद्धव ठाकरे यांना कुणी दिलं चॅलेंज?
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केलेल्या 'त्या' टीकेवर भाजपच्या नेत्यानं दिलं खुलं आव्हान, काय केला हल्लाबोल....
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बारसू-सोलगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कातळ शिल्प परिसरालाही भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर बारसू रिफायनरीसारखे प्रकल्प राज्यात नको. महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करत प्रकल्प जर जबरदस्तीने लादाल तर महाराष्ट्र पेटवू, असा इशारा सत्ताधाऱ्यांनी दिला होता. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र सोडा फक्त मुंबई तरी बंद करुन दाखवा, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे. उगाच मोठ्या मोठ्या बाता करू नका, महराष्ट्र पेटवणं आता तुमच्या हातात राहिलं नसल्याचं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील सभेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.