‘उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं रक्त नाही, ते जर हयात असते तर XXX लाथ मारून…’, भाजप नेत्याची जहरी टीका
महाविकास आघाडीने सरकारविरोधात काल जोडे मारो आंदोलनही केलं. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चाही काढला. यावरून नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मविआ नेत्यांनी काल सरकारला धारेवर धरलं. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचे म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर ‘ बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते’ अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले.