Nitesh Rane : ‘… तर माझ्या विजयात उद्धव ठाकरे यांचा खारीचा वाटा’, नितेश राणे असं का म्हणाले?
सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आजपासून जाहीर प्रचारसभांचा धडाका पाहिला मिळणार आहे. आज पहिली सभा ही उद्धव ठाकरे यांची होत आहे. यावर काय म्हणाले भाजप नेते नितेश राणे?
कणकवली हा भाजप नेते नितेश राणे यांचा गड मानला जातो. तिथेच उद्धव ठाकरेंची ही सभा होत आहे. यावरच नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्राची भागवती आज आमच्याकडे येतेय. उद्धव ठाकरे कणकवलीमध्ये येणे म्हणजे माझं लीड वाढवून जाणं असं आहे, असा दावा नितेश राणे यांनी केलाय. जी भाषा उद्धव ठाकरे कणकवली येथे येऊन वापरताय. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कणकवली, वैभववाडी, देवगड, सिंधुदुर्ग किंवा कोकणासाठी या माणसाने एक दमडी न देता कोणताही विकास केला नाही, तो फक्त राजकारण करण्यासाठी सिंधुदुर्गात येतो आणि आम्हाला केवळ शिव्या शाप देण्यासाठी येतो, मात्र माझे मतदार त्यांना उत्तर देतात, असं नितेश राणे म्हणाले. तर उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीला आले मला शिव्या शाप देऊन गेले आणि माझं लीड वाढवून गेले. आता ही उद्धव ठाकरे येणार आहेत, माझा विजय तर पक्काच आहे. माझं लीड हे ऐतिहासिक असेल आणि त्यात सिंहाचा नाही पण खारीचा वाटा हा उद्धव ठाकरेंच्या सभेचा असेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.