Attack On Sandeep Deshpand : भाजपच्या या नेत्याने ही घेतली संदीप देशपांडे यांची भेट

| Updated on: Mar 03, 2023 | 12:00 PM

मनसे नेते संदिप देशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी मनसे नेत्यांसह भाजप नेते देखील त्यांच्या भेटीला पाहोचले.

Attack On Sandeep Deshpande : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा मनसेसह सर्वच स्तरातून निषेध होत आहे. संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करत असताना हल्ला झाला. काही अज्ञात व्यक्तींना स्टम्प आणि रॉडने देशपांडे यांच्यावर हल्ला केल्या. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संदीप देशपांडे यांच्या हाताला फॅक्चर असून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि अमित ठाकरे ( AMit Thackeray ) रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. मनसे नेत्यांसोबतच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील रुग्णालयात जावून देशपांडे यांची भेट घेतली.

संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांच्यावरील हल्ल्यामागे कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी ही त्यांनी या वेळी केली आहे.

 

Published on: Mar 03, 2023 11:59 AM
संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग नोटीशीवरून मोठी बातमी, आज संध्याकाळी उत्तर द्यावं लागणार अन्यथा…
अन् भाजपची झोप उडाली, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल; बघा काय केली टीका