शाळेतील ‘ढ’ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो म्हणजे, भाजप नेत्याची राऊतांवर खोचक टीका
'आज संजय राऊत आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळलं? आणि या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर किती अन्याय झाला? हे सांगणारा कोण आहे? अशा मालकाचा कामगार जो जाहीर कार्यक्रमात सर्व उद्योगपतींच्या समोर कबूल करतो की मला बजेट बद्दल काहीही कळत नाही, मी ढ आहे', नितेश राणेंचा हल्लाबोल काय?
केंद्र सरकारने काल आपला अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या काना-कोपऱ्यातून या केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक होत आहे. मात्र विरोधकांकडून विशेषतः संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका करण्यात आली. यावरच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. ‘शाळेतील सर्वात ‘ढ’ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर बोलतो. आपलं ज्ञान देतो. तेव्हा हसण्यापलीकडे काही वाटत नाही, असे म्हणत नितेश राणेंनी खोचक टीका केली. तर आज संजय राऊत आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळलं? आणि या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर किती अन्याय झाला? हे सांगणारा कोण आहे? अशा मालकाचा कामगार जो जाहीर कार्यक्रमात सर्व उद्योगपतींच्या समोर कबूल करतो की मला बजेट बद्दल काहीही कळत नाही, मी ढ आहे. अर्थसंकल्प आल्यानंतर कोणीही त्यांनी प्रतिक्रिया विचारली तर गरिबाला गरीब आणि श्रीमंत लोकांना श्रीमंत करण्याचे बजेट असे याचा मालक म्हणतो… त्याचा हा विद्यार्थी’, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.