Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरे लंडनच्या तयारीत, जाताना त्यांनी भांडुपच्या देवानंदला…’, नितेश राणेंचा राऊतांवर खोचक पलटवार

| Updated on: Nov 24, 2024 | 3:57 PM

संजय राऊत यांनी महायुती सरकारचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? यावर भाष्य करतांना मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी गुजरातला घ्यावा, असं म्हणत महायुतीला टोला लगावला आहे. यावर खोचकरित्या भाष्य करत नितेश राणेंनी पलटवार केलाय.

महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत होणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी महायुती सरकारचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? यावर भाष्य करतांना मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी गुजरातला घ्यावा, असं म्हणत महायुतीला टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. त्यांनी महाराष्ट्रात शपथ घेण्यापेक्षा गुजरातला जाऊन शपथविधी सोहळा घ्यावा. त्यांना याचा जास्त आनंद होईल. गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक मोठा स्टेडिअम आहे तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा घेणं अतिशय योग्य ठरेल. शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल किंवा जर तो शपथविधी वानखेडेवर घेतला तर त्याच्यासमोरील १०६ हुतात्मांचा अपमान ठरेल’. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेवर भाजपचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, ‘यांनी आता महाराष्ट्र सोडण्याची तयारी करावी. मी ऐकलंय उद्धव ठाकरे लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. कारण कधी कोणता मुलगा अटक होईल भरवसा नाही. त्यामुळे त्यांना सोबत पाळीव प्राणी हवा ना. तर त्यांनी भांडुपच्या देवानंदला घेऊन जावं, काही हरकत नाही. ‘, असं म्हणत खोचकरित्या भाष्य करत नितेश राणेंनी पलटवार केलाय.

Published on: Nov 24, 2024 03:57 PM
Kangana Ranaut : ‘… त्यामुळे दैत्यांचं तेच झालं’, ‘मविआ’च्या दारूण पराभवावर कंगना राणौत यांचा घणाघात
अजित पवारांचा शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला थेट फोन अन्… दादा नेमकं काय म्हणाले?