बायकोचाही फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू, नितेश राणेंची पोलिसांना धमकी

| Updated on: Aug 14, 2024 | 1:34 PM

भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले. सरकार हिंदूंचे असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की तिथे तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा राणेंनी दिला होता.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना पुन्हा एकदा धमकी दिल्याचे समोर आले आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, असं नारायण राणे म्हणाले. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. ‘पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना सांगेल, सरकार हिंदुत्ववादी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तुम्हाला जर तुमच्या पोस्टिंगवर मजा येत नसेल तर अशी मस्ती करा… तुम्हाला आशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की, बायकोचा फोनही लागणार नाही’, अशी थेट धमकीच नितेश राणेंनी पोलिसांना दिली. पुढे ते असेही म्हणाले, हिंदू मुलींच्या आणि तिच्या वडिलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आलेत तर त्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्या डोळ्यातून काढणार याची गॅरंटी इथे देतो, असं नितेश राणे म्हणाले.

Published on: Aug 14, 2024 01:34 PM
‘लाडकी बहीण’वरून रवी राणा, महेश शिंदेंच्या वक्तव्यानं वाद पेटला, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना भरला दम
Diva Railway Station Protest : लोकल पकडताना दिवेकरांचे हाल, आक्रमक होत प्रवाशांचं आंदोलन; मागणी काय?