हिरव्या सापाची जीभ वळवळतेय, मुनव्वर फारूकीला नितेश राणे दाखवणार मालवणी हिसका, म्हणाले…
कोकणी माणसावर बोलताना स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकीने चुकीचे शब्द वापरले. यानंतर राजकीय वर्तुळातून काही नेत्यांनी हल्लाबोल केलाय. भाजप नेते नितेश राणे यांनी देखील अतिशय कठोर शब्दांत मुनव्वर फारुकीवर निशाणा साधत त्याला इशारा दिला आहे.
स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकीने स्टॅंडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल बोलताना अपशब्द वापरला आहे. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात, असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी करतो.यावर भाजप नेते नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीवर निशाणा साधत त्याला इशारा दिला आहे. “हा कोण मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप, त्याची जीभ चांगलीच वळवळायला लागली आहे. त्याला आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये कोकणातील लोकांबद्दल टिंगल उतरण्याची जास्तच खाज असेल तर त्याचा घरचा पत्ता आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्याला लवकरच मालवणी हिस्का दाखवावा लागेल की, तो त्याची स्टँडअप कॉमेडी मालवणीत करायला लागेल. कोकणी माणासाची अशी टिंगल करत असशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही”, असं म्हणत नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीला चांगलंच फटकारलं आहे.