Pankaja Munde : ‘अजितदादांची मी माफी मागते…’, सिंदखेडराजा मतदारसंघात जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Nov 13, 2024 | 5:59 PM

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार शशिकांत खेडेकर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे तर शरद पवार गटाचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे हे विधानसभेच्या रिंगणात आहे. महायुतीच्या उमेदवारांसमोरं डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आव्हान असणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार शशिकांत खेडेकरांना विजयी करा, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. तर यावेळी पंकजा मुंडे यांनी हात जोडून माफी मागते असंही वक्तव्य केलं. शशिकांत खेडेकर यांच्या विजयाच्या आवाहनानंतर पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची माफी मागितली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार शशिकांत खेडेकर तर अजित पवार गट राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ‘कोणत्याही दबावाला बळी पडू नका. मग कोणी पाडायला उभं असतं कोणी निवडून यायला उभं असतं. मी निवडून येणाऱ्यांच्या प्रचाराला येत असते. मी तुम्हाला विनंती करते आणि अजित पवारांची क्षमा मागते…’, असं वक्तव्य प्रचारसभेतील जाहीर भाषणात पंकजा मुंडे यांनी केलंय. या सभेला मी यावं मी हे निवडलंय, असं मला वाटतंय.. यामध्ये कोणताही भेद नाही. मी राज्यभर फिरत असल्याचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.

Published on: Nov 13, 2024 05:59 PM
Nitesh Rane : ‘… तर माझ्या विजयात उद्धव ठाकरे यांचा खारीचा वाटा’, नितेश राणे असं का म्हणाले?
विधानसभेच्या प्रचारापेक्षा बॅग चेकिंगचा मुद्दा तापला, उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला; राणेंची आक्रमक मागणी