आमदार होताच पहिल्यांदा बीडमध्ये जाण्यापूर्वी पंकजा मुंडे म्हणाल्या, जेसीबीने माझ्यावर फुलं उधळू नका, कारण…
पंकजा मुंडे यांचा वाढदिवस हा २६ जुलै रोजी असतो. दरम्यान, नुकतच पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर करून कार्यकर्त्यांना हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक मेसेज करा, असे आवाहन केले आहे. हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात वाढदिवस साजरा करणे हे...
भाजप नेत्या आणि नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे या आपला वाढदिवस कधीच साजरा करत नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी याचे कारण देखील माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितले. पंकजा मुंडे यांचा वाढदिवस हा २६ जुलै रोजी असतो. दरम्यान, नुकतच पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर करून कार्यकर्त्यांना हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक मेसेज करा, असे आवाहन केले आहे. हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात वाढदिवस साजरा करणे हे सद्य परिस्थितीत समर्पक वाटत नाही. त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरुपी एका मेसेजवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला द्या, असे म्हटले होते. तर पंकजा मुंडे या आपला वाढदिवस साजरा करत नाही. आपला वाढदिवस साजरा करणं हे आवडत नाही. कारण त्या दिवशी जन्माला येणं यामध्ये माझं कोणतंच योगदान नाही. त्यामुळे वाढदिवस साजरा करावं, असं वाटत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्यात.