Pankaja Munde :‘बटेंगे तो कटेंगेच्या’ वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या, ‘ऑन रेकॉर्ड बोलले का?’

| Updated on: Nov 14, 2024 | 5:45 PM

विधानसभेच्या निवडणुकीकरता राज्यात प्रचाराचा धडाका सुरू आहे. यातच आता बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तो प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेबाबत थेट वक्तव्य केलं आहे . एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ या आख्यायिकेची गरज नाही, असं त्या म्हटल्या होत्या. खरे सांगायचे झाले तर माझे राजकारण वेगळे आहे. मी फक्त त्या पक्षाची आहे म्हणून समर्थन करणार नाही, केवळ विकासावरच काम केले पाहिजे, असा माझा विश्वास आहे, असं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मात्र आता पंकजा मुंडे यांनी यावर थेट बोलणं टाळलंय. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मी ऑन इयर कुठे बोलले आहे का? ऑन रेकॉर्ड बोलले का? ते फक्त प्रिंटलाच आलं आहे. त्यावर मी बोलणार नाही. यावर मी लवकरच बोलेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे

Published on: Nov 14, 2024 05:44 PM
Dhananjay Munde : ‘पंकजा ताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज…’, भर सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
बापासाठी लेकीचा प्रचार, अमित ठाकरेंविरोधात प्रिया सरवणकर भिडल्या, संदीप देशपांडेंवरही निशाणा, ‘लाथ घालून वरळीत…’