Pankaja Munde यांनी मराठा आरक्षणावरून मांडली थेट भूमिका; म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांनी माय-बापाची…’

| Updated on: Sep 04, 2023 | 11:18 AM

VIDEO | भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाचा उल्लेख करत पंकजा मुंडे म्हणाल्या ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडताना आम्ही मराठा आरक्षणाबद्दल देखील विचार करावा, अशी आमची जुनीच मागणी आहे

छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसापासून जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलन सुरू असून आज त्याचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशीही आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरूच आहे. तर त्यांनी आपलं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी सरकारकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सल्ला दिला आहे. पकंजा मुंडे म्हणाल्या, ‘या परिस्थितीकडे मी फार चिंतेने पाहते. चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. लाठी हल्ल्याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी. सीरियस अटेंशनची गरज आहे. ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडताना आम्ही मराठा आरक्षणाबद्दल देखील विचार करावा, अशी आमची जुनीच मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी. आंदोलकांच्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा. कागदपत्रे न्यायालयात टिकतील असा विचार करावा. ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळे आहे.’

Published on: Sep 04, 2023 11:15 AM