माझं नाव चर्चा ठेवलं पाहिजे, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

| Updated on: Jul 29, 2024 | 5:53 PM

विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे आज बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी बीडच्या भगवान भक्तीगडावर जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर खोचकपणे उत्तर दिलं आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी थेट उत्तर दिलं आहे. याची मला कोणताही कल्पना नाही. प्रत्येक वेळी चर्चा होत असते, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली. तर माझं नाव चर्चा ठेवलं पाहिजे, असं खोचक उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्रिपदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी असं उत्तर दिलं आहे. विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे आज बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी बीडच्या भगवान भक्तीगडावर जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कोणतीही कल्पना नाही. प्रत्येक वेळी माझी चर्चा असते म्हणून माझं नाव चर्चा ठेवा. मंत्रिमंडळ विस्ताराबाबात मला कुठलीही कल्पना नाही ते पक्षातील वरिष्ठांना माहिती असेल. माझं नाव चर्चा असं ठेवलं पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि मंत्री पदाच्या चर्चेवरून प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 29, 2024 05:53 PM
विधानसभेला 288 उमेदवार पाडणार, जरांगे पाटलांच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर
फोटोला फोटोनं उत्तर देणार, अनिल देशमुख यांचा पर्दाफाश होणार? चित्रा वाघ यांचा इशारा