Pankaja Munde यांनी मराठा तरुणांना हात जोडले अन्…

| Updated on: Sep 08, 2023 | 12:46 PM

VIDEO | सोलापुरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले, यावेळी त्यांनी मराठा तरुणांना हात जोडले आणि आत्महत्या न करण्याचा दिला सल्ला, Watch Video

सोलापूर, ८ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या या परिक्रमेत जनतेकडून त्यांना अनेक प्रश्न, गा-हाणी मांडण्यात येत आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचे प्रश्न सांगितले. त्या सोलापुरात बोलत असताना त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तर मराठा समाज आणि त्यातील तरूणांना विशेषतः आवाहनही केले. पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना हातजोडले आणि आत्महत्या करू नये अशी हातजोडून विनंती केली. त्या म्हणाल्या, सर्व लेकरांना मी विनंती करते. संवैधानिक अधिकाराने मराठा आरक्षणाची मागणी करा. पण त्यासाठी स्वत:चा जीव देऊ नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशंज आहोत. त्यांच्या नीतीनुसारच आपण लढलं पाहिजे, आत्महत्या त्याला हा पर्याय नाही, त्या मार्गानं जाऊ नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Published on: Sep 08, 2023 12:46 PM
Pankaja Munde यांचं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य, काय म्हणाल्या?
‘मी सांगितलेला आकडा एकदम परफेक्ट असतो’, गिरीश महाजन यांनी काय केला मोठा दावा?