Pankaja Munde | बहीण जन्मली तेव्हा लोक म्हणाले कुळ बुडालं!: पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज परळीमध्ये होत्या. पंकजा मुंडे यांनी श्रावणमास सण मैत्रिणींचा कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांनी लहानपणीची आठवण सांगितली.
परळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज परळीमध्ये होत्या. पंकजा मुंडे यांनी श्रावणमास सण मैत्रिणींचा कार्यक्रमाला हजेरी लावली. पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत फेरी काढली. मोंढा मार्केट परिसरातील हॉटेल मध्ये पंकजा मुंडे यांनी चहाचा आस्वाद घेतला. परळीत एक तासापासून मदत फेरी सुरू होती. पंकजा मुंडे यांच्या मदत फेरीला नागरिकांनी चागंला प्रतिसाद दिला. श्रावणमास सण मैत्रिणींचा या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी त्यांची एक आठवण सांगितली. पंकजा मुंडे यांच्या एका बहिणीच्या जन्मावेळी त्यावेळच्या महिलांची कुळ बुडालं अशी चर्चा सुरु होती, असं त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की त्यांच्या आईनं असं काही नसतं असं सांगितलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या नावामध्ये आईचं नाव लावतात हे कौतुकास्पद असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.