Pankaja Munde यांचं शिवशक्ती यात्रेतून शक्तिप्रदर्शन? राजकीय विषयांवर बोलण्यास दिला नकार, पाहा स्पेशल रिपोर्ट
tv9 Special Report | माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनानं पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेला आजपासून सुरुवात, देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे शक्तिप्रदर्शन करत आहेत का?
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा सुरु झाली आहे. देवदर्शनाच्या यात्रेद्वारे पंकजा मुंडे शक्तिप्रदर्शन करत आहेत. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नांदेंडमधून पंकजा मुंडेंचा शिवशक्ती दौरा सुरु झालाय. माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनानं पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रा सुरु झालीय. पुढचे ११ दिवस पंकजा मुंडे विविध १० जिल्ह्यातून देवदर्शनासाठी दौरा करतील. देवदर्शनानिमित्त पंकजा मुंडे कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पंकजा मुंडेंचे समर्थक मानले जातात. जानकरांचा पक्ष कुणासोबत युती करणार, हे अद्याप त्यांनी सांगितलेलं नाहीय., मात्र देवदर्शन यात्रेच्या निमित्तानं आपण पंकजा मुंडेंसोबत राहणार असल्याचं जानकरांनी म्हटलंय. देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे शक्तिप्रदर्शन करत आहेत का? धनंजय मुंडे सत्तेत गेले याबद्दल काय वाटतं? अशा अनेक मुद्द्यांवर पंकजा मुंडेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. नेमकं काय आहे पकंजा मुंडे यांचं म्हणणं, बघा स्पेशल रिपोर्ट