Pankaja Munde | भडकलेल्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्याला मारली चापट

Pankaja Munde | भडकलेल्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्याला मारली चापट

| Updated on: Aug 16, 2021 | 7:22 PM

भागवत कराड परळीत दाखल झाले त्यावेळी मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं.

परळी : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरु करण्यात आली. गोपीनाथ गडावरुन या यात्रेची सुरुवात झाली. मात्र, यात्रेपूर्वी परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल झाले त्यावेळी मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पंकजा यांनी एका कार्यकर्त्याच्या पाठीवर झपका दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Know This : तालिबानच्या उदयापासून ते अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्याचा प्रवास कसा ?
Maharashtra Lockdown | राज्यातले सर्व मॉल रात्री 10 वाजेपर्यत सुरु राहणार