‘आम्ही दोघे राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या’, भाजप नेत्याचं जरांगें पाटलांना थेट आव्हान

| Updated on: Jul 22, 2024 | 5:34 PM

'मनोज जरांगे पाटील यांनी समाजकारणात राजकारण आणू नये. इतकंच काय तर त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू नये आणि जर मनोज जरांगे पाटील यांना राजकारण करायचं असेल तर मी त्यांना सांगतो, मी आणि प्रवीण दरेकर आम्ही राजीनामा देतो. त्यांनी राजकारणात यावं, आमदार व्हावं,', कुणी दिलं आव्हान?

प्रसाद लाड यांना मला मॅनेज करायचे आहे का? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, मी आणि प्रवीण दरेकर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं, असं थेट आव्हानच भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांनी समाजकारणात राजकारण आणू नये. इतकंच काय तर त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू नये आणि जर मनोज जरांगे पाटील यांना राजकारण करायचं असेल तर मी त्यांना सांगतो, मी आणि प्रवीण दरेकर आम्ही राजीनामा देतो. त्यांनी राजकारणात यावं, आमदार व्हावं, आमच्या दोघांच्या जागी जरांगेंनी आणखी त्यांच्या कोणा एका मार्गदर्शकाला आणावं, त्याने विधानपरिषदेत भूमिका मांडावी त्याला आम्ही निवडून आणू’, असे म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

Published on: Jul 22, 2024 05:34 PM
रविकांत तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाई, कारण काय?
‘आरक्षणावरच चर्चा की दंगली घडवण्यासंदर्भात?’, शरद पवार अन् एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून जरांगे पाटलांचा निशाणा