विजय वड्डेटीवार यांनी आपल्या कन्येला संस्कार द्यावेत, भाजप नेत्यानं काय केली सडकून टीका?
VIDEO | विजय वड्डेटीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाजप नेता आक्रमक, म्हणाले...
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केलीय. “हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. कुठला मोर्चा काढतात? तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात? सावरकर मला तर… माझ्यासोबत सगळ्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते, काय विचार होते. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्या सारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात”, अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे. या टीकेवरून भाजप आमदार प्रसाद लाड हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या कन्येला संस्कार द्या, असे विजय वडेट्टीवार यांना म्हणत प्रसाद लाड यांनी शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.