ट्विटरची जशी चिमणी उडाली तशीच उद्धव ठाकरेंच्या…,भाजप नेत्याची खोचक टीका
अमित शहांवर बोलण्याइतके उद्धव ठाकरे मोठे झालेले नाहीयेत, त्यांना आता पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत. ट्विटरची जशी चिमणी उडाली आहे तशीच यांच्या स्वप्नांची चिमणी उडेल असे म्हणत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : २०१३ चा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले माझं पद अवैध्य होतं तर अमित शाह मातोश्रीवर का आले होते? असा सवालही करत त्यांनी इशाराही दिला होता. यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. अमित शहांवर बोलण्याइतके उद्धव ठाकरे मोठे झालेले नाहीयेत, त्यांना आता पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत. ट्विटरची जशी चिमणी उडाली आहे तशीच यांच्या स्वप्नांची चिमणी उडेल असे म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला. तर उद्धव ठाकरेंनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्यातून दिसतंय की त्यांची दिशा गेलीये आणि दशा झालीये. काल झालेली पत्रकार परिषद ही पत्रकार परिषद होती की वरळी विधानसभेचा मेळावा होता? असा सवाल करत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. तर राहुल नार्वेकर यांनी जो खुलासा केला त्यानंतर त्यांची काहीच पद राहिले नाहीये. न्यायालयावर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले, सुप्रीम कोर्टावरही त्यांचा विश्वास नाही, यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, विनाशकाले विपरित बुद्धी झालीये, असे म्हणतही लाड यांनी खोचक टीका केली.