‘या’ रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर, रविवारचा मेगाब्लॉक होणार रद्द, कारण…

| Updated on: Apr 15, 2023 | 6:37 AM

VIDEO | मुंबईतील तीनही रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी, भाजप नेत्याचं रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र

मुंबई: मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेचा दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र यंदा हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मनसेचे आमदार राजू पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला हार्बर रेल्वे मार्गावरील या रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. मध्य रेल्वेने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता हार्बर रेल्वे प्रवाशांना रविवारी रेल्वेने प्रवास करता येणार आहे. तर आमदार प्रसाद लाड यांनी तीनही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी राज्यरेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 16 एप्रिलला डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. म्हणून या रविवारी कुठलाही मेगाब्लॉक नको, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Apr 15, 2023 06:32 AM
‘वज्रमुठी’मुळे त्यांची दातखिळी बसेल; फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाच्या खासदाराचे प्रत्युत्तर
ठाणेकरांनो… येऊरला जाताय? ‘या’ वेळेनंतर बाहेर पडता येणार नाही, काय आहे कारण?