गजानन किर्तीकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याचं भाष्य; म्हणाले, ‘टाळी एका हाताने…’
VIDEO | शिवसेना - भाजपमध्ये दुरावा निर्माण होणार की नाही? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक गजानन किर्तीकर यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे. गजानन किर्तीकर म्हणाले, शिवेसनेचे ४० आमदार एकत्र आल्यामुळेचे आज भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली. त्यामुळे आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ४० आमदार सोबत होते म्हणूनच महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे. यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘शिवसेनेचे ४० आमदार आणि भाजपच्या आमदार एकत्र आले म्हणून सत्ता आलीये. टाळी एका हाताने वाजत नाही. ताकद आपापसात आजमावण्यापेक्षा विरोधकांनी त्या ताकदीचा धस्का घेतला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही वक्तव्याने शिवसेना – भाजपमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी’, असा सल्ला दरेकर यांनी गजानन किर्तीकर यांना दिलाय.