Pravin Darekar : मुख्यमंत्री समोर अन् प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतली दुसऱ्याच ‘या’ दोन नेत्यांची नावं
VIDEO | बोरिवलीमधील या दांडियाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. मात्र या ठिकाणी प्रविण दरेकर हे मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करताना अडखळल्याचे पाहायला मिळाले. प्रविण दरेकर हे एकनाथ शिंदे यांचं नाव घेताना अडखळले आणि...
बोरिवली, २२ ऑक्टोबर २०२३ | मुंबईसह देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. देवीचं मंदिर म्हणा किंवा मंडळात देवीची स्थापना म्हणा, नवरात्रोत्सवाची जत्रा म्हणा…सर्वत्र एकच आनंदाचं वातावरण आहे. अशातच राजकीय नेते मंडळींनी रास गरबा आणि दांडियाचे आयोजन केले आहे. डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर बोरिवलीमध्ये भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी मोठ्या स्तरावर गरबा दांडियाचे आयोजन केले आहे. बोरिवलीमधील या दांडियाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. मात्र या ठिकाणी प्रविण दरेकर हे मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करताना अडखळल्याचे पाहायला मिळाले. प्रविण दरेकर यांच्याकडून चुकीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे समोर असतानाच दांडिया कार्यक्रमात हा प्रकार घडला. मात्र एकनाथ शिंदे यांनी यावेळी मिश्किल हास्य केले.