“कोणी, कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो”
"कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रातरणा केल्यावरच तो पक्ष संपतो असतो. हा देशातला इतिहास आहे"
मुंबई: “कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रातरणा केल्यावरच तो पक्ष संपतो असतो. हा देशातला इतिहास आहे” असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. “हिंदुत्वाची शिवसेनेची मूळ विचारधारा होती, त्याला तिलांजली दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भूमिकेचा तिरस्कार केला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या मांडील मांडी लावून बसलात, त्याचवेळी शिवसेनेची अधोगती सुरु झाली. त्यामुळे कोणी, कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो” असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.
Published on: Jul 25, 2022 05:31 PM