Pravin Darekar | कुणाच्या सांगण्यावरून ED तपास करत नाही : प्रवीण दरेकर
प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही.
मुंबई: ईडी कधी सूडाने कारवाई करत नाही. ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील त्यामुळेच त्यांनी नोटीस बजावली असेल, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काढलं. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे, त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते. ईडी किंवा तपास यंत्रणांना सूडाने कारवाई करता येत नाही. आपल्या देशाचं संविधान आणि कायदा मजबूत आहे. प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही. ईडी कुणाच्या सांगण्यावरून तपास करत नाही. काही धागेदोरे असतील म्हणूनच नोटीस बजावली असेल, असं दरेकर म्हणाले.