Ram Kadam | पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणारच हा आमचा निर्धार : राम कदम
आम्ही दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे. उद्या परपंपरिक वेषभूषा करून राधा आणि कृष्ण घाटकोपर पोलीस स्टेशनवर दहीहंडी घेऊन पोचणार. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.
मुंबई : आम्हाला कोणतेही थर रचायचे नाहीत. कोणतीही गर्दी न करता पारंपरिक पद्धतीने आम्हला दहीहंडी साजरी करायची परवानगी हवी आहे, ती आम्ही मागत आहोत. आम्ही उद्या पारंपरिक दहीहंडी साजरी करणार. हे जुलमी ठाकरे सरकार हिंदू सणांंना परवानगी देण्याऐवजी आम्हाला पोलीसांद्वारे नोटीस देत आहे. आम्ही दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे. उद्या परपंपरिक वेषभूषा करून राधा आणि कृष्ण घाटकोपर पोलीस स्टेशनवर दहीहंडी घेऊन पोचणार. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी करणारच हा आमचा निर्धार आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.