‘उत्तमरावांनी बोलवून घेतलं अन्…’, मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट

| Updated on: Dec 03, 2024 | 1:42 PM

राम सातपुते यांच्याकडून एक ऑडिओ रेकॉर्डिंग ट्विट करण्यात आलं आहे. बॅलेट पेपर मतदानाचा हेतू क्लिपद्वारे स्पष्ट होतोय, असं राम सातपुते यांनी म्हटलंय. दरम्यान, टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

मारकडवाडी येथील फेर मतदानासंदर्भात भाजपच्या राम सातपुते यांनीही एक ट्वीट केले आहे. राम सातपुते यांच्याकडून एक ऑडिओ रेकॉर्डिंग ट्विट करण्यात आलं आहे. बॅलेट पेपर मतदानाचा हेतू क्लिपद्वारे स्पष्ट होतोय, असं राम सातपुते यांनी म्हटलंय. राम सातपुतेंकडून ट्विट करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आबा मारकड आणि एका नागरिकातील संवाद दिसतोय. ‘आम्हाला उत्तम जानकर यांनी बोलवून घेतलं. यानंतर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वाया गेलं. मला केव्हाच मारकडवाडी सोडत नाही. तर मशीनचा दोष आहे, बरं का.. इतकं पळाला इतकं पळाला..पैसे भरण्यापासून मला सगळं माहिती आहे लेका.. मी होतोच म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडे… नाहीतर गावात कोणीच केलं नाही इतकं काम मी केलं उत्तम जानकरांचं… निवडणूक झाली.. गावात इलेक्शन घ्यायचं ठरलंय. फिक्श झालंय. म्हणजे काय करायचंय माहितीये का.. खरंच उत्तम जानकर यांच्याविरोधात गेलं का मतदान का पेटीचा दोष आहे. बरं त्यातून काय निष्पन्न होणार नाही, मत करायचं आम्ही सांगतोय म्हणून..’, असा संवाद त्या क्लिपमध्ये आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Published on: Dec 03, 2024 01:42 PM