अब्दुल सत्तारांच्या साडी वाटपावरून रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, ‘बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?’

| Updated on: Oct 07, 2024 | 12:32 PM

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र या साड्या मिळताच महिलांनी या साड्यांची होळी केली. याचा व्हिडीओही समोर आला आहे. यावरच रावसाहेब दानवेंनी हल्लाबोल केलाय.

Follow us on

बायका आमच्या, साड्या त्यांच्या? कोण स्वाभिमान गहाण ठेवेल, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. अब्दुस सत्तार यांच्याकडून महिलांना साडी वाटप करण्यात आलं होते. या साडी वाटपावरून रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. तर अब्दुल सत्तारांनी इतक्या वर्षात साड्या वाटल्या नाही आणि आताच कशा वाटल्या? असा सवाह रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. तर कपड्यांवरून लाच दाखवण्याचं काम सुरू आहे का? असा सवालबी रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ‘बायका आमच्या, साड्या त्यांच्या? मला नाही वाटत कोणता स्वाभिमानी माणूस अब्दुल सत्तार यांच्याकडून साड्या घेईल. साड्या आताच का वाटतो? एवढ्या वर्षात का नाही वाटल्या साड्या? महिलांना लालूच दाखवली जात आहे का? विकासाची काम करा…विकासाची काम करून विकासावर मतं मिळवा. आमचं एकच म्हणणं आहे. विकास करा आणि विकासाच्या जोरावर मतं घ्या’, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं.