चंद्रशेखर बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ दोन नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार फायनल?
रवींद्र चव्हाण यांच्या नावासोबतच आता प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रवीण दरेकर यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांची आता भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काल भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर आली होती. रवींद्र चव्हाण यांच्या नावासोबतच आता प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रवीण दरेकर यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांची आता भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला होता. त्यांनी काल नागपुरात मंत्रिपदाची शपथ ग्रहण केल्याचे पाहायला मिळाले. या शपथविधीनंतर चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यात मंत्री झाले आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून असणार याची चर्चा कालपासूनच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासह आता प्रवीण दरेकर यांचं नाव समोर आल्याने या पदासाठी शर्यत वाढली असून प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.