Sambhajiraje | तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होणार, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी सोबत बसण्याची गरज आहे असं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : 102 वी घटना दुरुस्ती करून चालणार नाही तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सुद्धा काढावी लागेल. तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समनव्य असण्याची गरज आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी सोबत बसण्याची गरज आहे असं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.