उन्मेष पाटील शिवबंधन हाती बांधणार? भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Apr 02, 2024 | 5:45 PM

उन्मेष पाटील यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत म्हणाले, उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. तर उन्मेष पाटील काही वेगळा निर्णय घेतील असं वाटत नसल्याचे थेट वक्तव्य जळगावातील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटलंय.

भाजपचे खासदार उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर जळगावातील ठाकरे गटाचे उन्मेष पाटील हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यताही आहे. उन्मेष पाटील यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत म्हणाले, उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. तर उन्मेष पाटील काही वेगळा निर्णय घेतील असं वाटत नसल्याचे थेट वक्तव्य जळगावातील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटलंय. मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेश पाटील हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत, असं स्मिता वाघ म्हणाल्या.

Published on: Apr 02, 2024 05:45 PM
आमचं ठरलंय… भाजपकडून नारायण राणेंचं सोशल मिडीयावर पोस्टर व्हायरल
देवेंद्र फडणवीस नव्हे ते तर फसवणीस, कुणाची खोचक टीका?