पहाटेच्या शपथविधीवरून भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, ‘ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी…’

| Updated on: May 14, 2023 | 11:12 AM

VIDEO | भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा, पहाटेच्या शपथविधीवरून काय केलं भाष्य

मुंबई : 2019 साली झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून आजही चर्चा केली जाताना दिसतेय. 2019 साली पहाटे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकार स्थापनेची शपथ घेतली होती. दरम्यान, या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केल्याचे समोर आले आहे. या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुनगंटीवार म्हणाले, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता,असे ते म्हणाले.

Published on: May 14, 2023 11:12 AM
महाराष्ट्र हे लुटीचं राज, जास्त काळ…; भाजपवर ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
….अन्यथा, आम्ही धमकी देत नाही, नाहीतर म्हणाल… राऊत यांचा नार्वेकरांना इशारा