भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया, म्हणाले; गुप्त भेट काहीतरी…
काल मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीतून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले होते तर आज त्यांनी थेट सिल्व्हर ओक गाठत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरच सुधीर मुनगंटीवार यांनी भुवया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे. बघा सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीतून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले होते तर आज त्यांनी थेट सिल्व्हर ओक गाठत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरच सुधीर मुनगंटीवार यांनी भुवया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यही अनेक गुप्त बैठका झाल्यात तर या तिघांच्या गुप्त बैठकीनंतरच आमदार फुटले, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काही भेटी या जाहीर होतात. तर त्या भेटीत काहीही ठरत नाही. जाहीर भेटीतून धक्कातंत्र होत नाही, या बैठका चहाच्या कपापुरत्या मर्यादित राहतात. पण जेव्हा गुप्त भेट होत असेल आणि ती माध्यमांना माहिती नसते. ती भेट काहीतरी घडवणारी असते, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.