एकनाथ शिंदे यांना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम

| Updated on: Dec 03, 2024 | 10:33 AM

गृहखात्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही असून जर गृहखातं मिळालं तर ते स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतरही अद्याप गृहखात्यांवर तोडगा निघालेला नाही.

गृहखात्यावरून शिंदे आणि भाजपमध्ये अजून तिढा कायम आहे. चर्चेतून मार्ग निघेल असं एकनाथ शिंदे म्हणालेत. मात्र अद्याप बैठक झालीच नाही. तर गृहखात्यावरून आग्रही असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला सुधीर मुनगंटीवार यांनी थेट उत्तर दिलंय. मागणी आणि हट्ट यात फरक असून तर्काच्या आधारे गृहखात्याचं वाटप होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. गृहखात्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही असून जर गृहखातं मिळालं तर ते स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाल्यानंतरही अद्याप गृहखात्यांवर तोडगा निघालेला नाही. त्यानंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठक एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते दरेगावी गेल्याने रद्द झाली. पण चर्चेतून मार्ग निघेल असे एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या नंबरचं खातं हे गृहखातं समजलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे जवळपास निश्चित आहे. तर यापूर्वीच गृहखातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलंय. त्यामुळे गृहखातं सोडण्यास भाजप तयार नाही. तर फडणवीसांनी गृहखातं स्वतःकडे ठेवल्यास अर्थखातं अजित पवार यांच्याकडे गेल्याने अजित पवार नंबर दोनचे नेते होणार आहे. त्यामुळे शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Dec 03, 2024 10:33 AM
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले…
मारकडवाडीत फेरमतदान होणार की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान